Responsive Ads Here

Friday, November 23, 2018

’नाळ’ सिनेमाचा पहिल्याच आठवड्यात विक्रम

मराठी प्रेक्षक ज्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होता. त्या सिनेमाला प्रदर्शित होऊन आज आठवडा झाला आहे. तो सिनेमा म्हणजे झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे प्रस्तुत ’नाळ’. सुधारकर रेड्डी दिग्दर्शित नाळ हा सिनेमा 16 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि अगदी सातच दिवसांतच या सिनेमाने बॉक्स ऑॅफिसवर धुमाकूळ घातली आहे.
सर्वत्र हाऊसफुल्लचा बोर्ड लावत या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात करोडोंची कमाई केली असून विक्रम रचला आहे. नागराज मंजुळे म्हटले की सिनेमा इतिहास रचणार यात शंकाच नाही आणि पुन्हा एकदा ते अधोरेखित झाले आहे. ’नाळ’ या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात तब्बल 14 करोड रुपयांची कमाई केली असून विक्रम रचला आहे.
श्रीनिवास पोकळेने चैत्याची भूमिका इतकी सुंदर निभावली आहे की, प्रत्येकाला ती आपलीच कथा वाटत आहे. लहान मुलाचे भावविश्‍व सुधाकर रेड्डीच्या या कथेत आहे. त्याला नागराज मंजुळेने जोडलेले संवाद अतिशय मनाला भावतात. आई आणि मुलाला जोडणारी ’नाळ’ इतक्या प्रभावीपणे या सिनेमात मांडली आहे की प्रत्येकाला त्याचे वेगळेपण अधोरेखित झाल्या शिवाय राहत नाही.
नागराजच्या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या सिनेमातील कलाकार. ज्या कलाकारांनी अभिनय क्षेत्रात काहीच काम केलेले नसते अशांना घेऊन नागराज सिनेमा करतो. तसाच श्रीनिवास या सिनेमात नवीन बालकलाकार आहे. तसेच नागराजने स्वत: या सिनेमात चैत्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे त्यामुळे हा सिनेमा नक्कीच वेगळा ठरतो.
फक्त शहरातीलच नाही तर ग्रामीण प्रेक्षकांना प्रेक्षकगृहापर्यंत घेऊन येण्याची ताकद ही नागराजमध्ये आहे. नाळ हा सिनेमा मुंबई, पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि इतर शहरांमध्येही प्रदर्शित झाला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. नाळ हा सिनेमा 450 चित्रपटगृहांमध्ये 11 हजार शोच्या माध्यमातून दुसर्‍या आठवड्यातही प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे.

’द लायन किंग’चा टीझर जाग्या करतोय अनेक आठवणी

1994 साली आलेल्या ’द लायन किंग’ या सिनेमाचा लाईव्ह-अ‍ॅक्शन रिमेक सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. ’डिस्ने’ने या नव्या सिनेमाचा टिझर प्रदर्शित केला आहे. वॉल्ट डिस्ने पिक्चर्स निर्मित आणि जॉन फॅवरू दिग्दर्शित हा सिनेमा जुन्या अनेक आठवणींना उजाळा देताना दिसतोय.
जॉन फॅवरू यांनीच ’द जंगल बुक’ या अ‍ॅनिमेटपटाचे दिग्दर्शन केले होते.
1994 साली आलेल्या ’द लायन किंग’ या सिनेमातील ’सर्कल ऑॅफ लाईफ’चे म्युझिक आजही अनेकांच्या लक्षात आहे.
’द जंगल बुक’ रिमेक प्रेक्षकांना अनेकांसमोर जुन्या आठवणी पुन्हा नव्याने उभ्या करणार यात शंकाच नाही.

रणवीर सिंहनंतर ’हा’ अभिनेता चढणार बोहल्यावर

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नांचा सिझन आहे. नुकताच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता जोधपुरमध्ये देसी गर्ल प्रियंका चोप्रा अमेरिकेतील सिंहर निक जोनससोबत 2 डिसेंबर रोजी लग्न करत आहे. तसेच कॉमेडिअन कपिल शर्मा देखील पुढल्या महिन्यात गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. वर्ष सरता सरता अनेक कलाकारांचे दोनाचे चार हात झाले असताना आणखी एका अभिनेत्याची लग्नाची बातमी समोर आली आहे.
आता अशी माहिती मिळतेय की, 42 वर्षांचा रणदीप हु्ड्डा लवकरच लग्न करणार आहे. आपल्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रणदीप लग्न करत आहे. तसेच लग्नानंतर हे दोघे अमेरिकेत स्थायिक होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की, रणदीप हुड्डा आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड नीतू चंद्रा यांच पुन्हा नाते सुरळीत सुरू आहे. गायक आदेश श्रीवास्तव याच्या मुलाच्या गाण्याच्या लाँचवेळी ही बातमी समोर आली.
पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती रणदीप हुड्डा किंवा नीतू चंद्राकडून मिळालेली नाही. नीतूला याबाबत विचारले असता तिने अद्याप आमच्या रिलेशनशिपमध्ये काहीच ठिक नसल्याचे सांगितले आहे. पुन्हा एकत्र येणं ही फक्त अफवा असल्याचे नीतू म्हणाली आहे.

कपिलला अमिताभ बच्चन यांनी दिला सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र

पुढील महिन्यात प्रेयसी गिन्नीसोबत कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा विवाहबंधनात अडकणार असून कपिलने नुकतीच महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात उपस्थिती लावली. कपिल या शोमध्ये एका स्वयंसेवी संस्थेला मदत करण्यासाठी सहभागी झाला होता. कपिलला या शोमध्ये शुभेच्छा देत अमिताभ यांनी त्याला सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्रही दिला आहे.
डिसेंबर महिन्यात प्रेयसी गिन्नीसोबत कपिल विवाहबंधनात अडकणार आहे. बच्चन यांनी यासाठी कपिलला खूप शुभेच्छा दिल्या. कपिलने या शोमध्ये बिग बींना सुखी संसाराचा कानमंत्र विचारला. कपिलच्या प्रश्‍नाने एकच हाशा पिकला. सुखी वैवाहिक जीवन जगायचे असेल तर ‘सॉरी’ हा शब्द सतत तुमच्या तोंडात असला पाहिजे. काहीही झाले तरी बायकोला सॉरी बोलत राहा. दोघांमध्ये जेव्हा तणावाचे वातावरण निर्माण होताना लक्षात येईल त्याक्षणी बायकोला सॉरी म्हणून टाका. हा एक शब्द तुम्हाला खूप मदत करू शकतो, असा कानमंत्र बच्चन यांनी कपिलला दिला.
कपिलने या कार्यक्रमात सर्वांसमोर बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांना लग्नासाठी आग्रहाचे आमंत्रण देखील दिले. बच्चन यांनी कपिलचे आमंत्रण स्वीकारत लग्नाला येण्याचे कबूल केले आहे. अमृतसरमध्ये कपिल 12 डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे.

शाहरुखच्या ’झिरो’चं पहिलं रोमॅन्टिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

रोमान्सचा बादशाह शाहरुख आणि अनुष्का शर्मा यांची रोमॅन्टिक केमेस्ट्री असलेले ’झिरो’चे पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ’जब तक मेरे नाम तू’, असे या गाण्याचे बोल आहेत.
या गाण्यात शाहरुख प्रेमाच्या रंगाची उधळण करताना दिसतो. तर, अनुष्काचाही रोमॅन्टिक अंदाज या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वीच ’झिरो’चा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये या गाण्याची छोटी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.
’झिरो’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक आनंद एल. राय आणि शाहरुख पहिल्यांदाच सोबत काम करत आहेत. शाहरुख यात एका कमी उंचीची व्यक्तिरेखा असलेले ’बउवा सिंग’चे पात्र साकारत आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांची तिहेरी जोडी पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट नाताळाच्या मुहूर्तावर म्हणजेच 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

नागराज मंजुळेच्या ‘नाळ’ने पहिल्याच आठवड्यात केली बक्कळ कमाई

मराठी चित्रपटांनी गेल्या काही वर्षांत विविध विषयांना हात घालत, अनोख्या पद्धतीने मांडणी करत मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवले आहे. झी स्टुडीओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ सारख्या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर नाळ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला. गेल्या आठवड्यात सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे.
पहिल्याच आठवड्यात नाळने 14 कोटी रुपयांची कमाई केली असल्याचा दावा झी स्टुडिओने केला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांसोबत नाळ जुळली आहे असे यावरून म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटात देविका दफ्तरदार, श्रीनिवास पोफळे, सेवा चव्हाण, दीप्ती देवी, ओम भुतकरआणि नागराज मंजुळे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
चित्रपटाची निर्मिती मृदगंध फिल्म्सचे वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर, नितीन प्रकाश वैद्य, प्रशांत मधुसूदन पेठे आणि सुधाकर रेड्डी तसेच नागराज मंजुळे यांनी केली असून चित्रपटाला प्रस्तुती झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे यांची लाभली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सुधाकर रेड्डी यांची असून संवाद नागराज मंजुळे यांचे आहेत.

अर्जून कपूर ‘एक व्हिलन’च्या सिक्वलचा व्हिलन?

2014 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला एक व्हिलन चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला. पहिल्या भागाच्या यशानंतर आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याचे म्हटले जात आहे.
अर्जून कपूर आणि सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट अधिक खास असणार आहे. कारण पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांची जोडी एकत्र झळकताना दिसणार आहे. रितेश देशमुखने पहिल्या भागात व्हिलनची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस त्याची भूमिकादेखील पडली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आता या भागात अर्जून कपूर व्हिलनची भूमिका साकारणार असल्याने त्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची तशीच पसंती मिळते का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
एकता कपूर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सध्या आपल्या ‘जबरिया जोडी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात सिद्धार्थ व्यस्त आहे. सिद्धार्थसोबत या चित्रपटात परिणीती चोप्रा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याआधी या दोघांनी ‘हसी तो फसी’ चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे.