Responsive Ads Here

Friday, November 23, 2018

अर्जून कपूर ‘एक व्हिलन’च्या सिक्वलचा व्हिलन?

2014 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला एक व्हिलन चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला. पहिल्या भागाच्या यशानंतर आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याचे म्हटले जात आहे.
अर्जून कपूर आणि सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट अधिक खास असणार आहे. कारण पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांची जोडी एकत्र झळकताना दिसणार आहे. रितेश देशमुखने पहिल्या भागात व्हिलनची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस त्याची भूमिकादेखील पडली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आता या भागात अर्जून कपूर व्हिलनची भूमिका साकारणार असल्याने त्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची तशीच पसंती मिळते का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
एकता कपूर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सध्या आपल्या ‘जबरिया जोडी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात सिद्धार्थ व्यस्त आहे. सिद्धार्थसोबत या चित्रपटात परिणीती चोप्रा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याआधी या दोघांनी ‘हसी तो फसी’ चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे.

No comments:

Post a Comment