येत्या 29 तारखेला दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांचा 2.0 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला असून या चित्रपटाबाबतची चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरनेही धुमाकूळ घातला होता. या ट्रेलरने अनेक रेकॉर्ड मोडले. 2.0 आता प्रदर्शनापूर्वीच ‘बाहुबली’ या सुपरडुपरहिट चित्रपटालाही टक्कर देताना दिसत आहे.
2.0 चित्रपटाची बर्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रजनीकांत आणि अक्षय कुमार एकत्र टक्कर देताना दिसणार आहेत. तमिळ, तेलुगु, आणि हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे एकुण बजेट हे जवळपास 500 कोटींचे आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 100 कोटींची कमाई केली आहे.
याबाबत एका माध्यमाने दिलेल्या माध्यमानुसार, बाहुबली चित्रपटाचा या बिग बजेट चित्रपटाने स्क्रिन्सच्या बाबतीत रेकॉर्ड मोडला आहे. तब्बल 6600 ते 6800 स्क्रिन्सवर हा चित्रपट झळकणार आहे. जवळपास 6500 स्क्रिन्सवर बाहुबली-2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला दाक्षिणात्य भागात 4000 ते 4100 स्क्रिन्स मिळाल्या आहेत. तमिळनाडुमध्ये 600 ते 625, केरळमध्ये 500 ते 525 आणि कर्नाटकमध्ये 300 स्क्रिन्सवर हा चित्रपट झळकणार असल्याचे वृत्त आहे. प्री-बुकिंगच्या माध्यमातून या चित्रपटाने तब्बल 120 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यामुळे, प्रदर्शनानंतर 2.0 चित्रपट अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

No comments:
Post a Comment