Responsive Ads Here

Friday, November 23, 2018

कॉपीराईटच्या कचाट्यात अडकला अक्षयचा ‘मिशन मंगल’!

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार, तापसी पन्नू आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘मिशन मंगल’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. पण चित्रपटाला सुरुवातीलाच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मिशन मंगलचे निर्माते अतुल कसबेकर यांच्यावर चित्रपट निर्माती राधा भारद्वाजने कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
राधा भारद्वाजने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे म्हटले जात आहे. तिने चित्रपटाचे चित्रीकरण आणि प्रदर्शन थांबवण्यात यावे अशी मागणी केली आहे. मी लिहिलेली एक कथा 2016 मध्ये निर्माते अतुल कसबेकर यांना सांगितली होती. मी यात मंगल मिशनमध्ये महिला इंजिनिअर यांच्यावर आधारित कथा लिहिली होती. आता अतुल कसबेकर त्याच कथेवर चित्रपट बनवत असल्याचे तिने म्हटले आहे.
भारताच्या मंगळयान मोहिमेवर आधारित अक्षयचा हा चित्रपट असणार असून या चित्रपटाचे नाव ‘मिशन मंगल’ असे असणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटातून मंगळयान मोहिमेत महिलांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी विद्या बालन, अक्षय कुमार, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शरमन जोशी आणि नित्या मेनन या कलाकारांच्या भूमिका असल्याचे म्हटले जात आहे. आता राधा भारद्वाजच्या आरोपांनंतर चित्रपटात काही बदल होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अन् दीपिकाच्या मदतीला धावला रणवीर

नुकतेच इटलीतील लेक कोमो येथे रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर बंगळूरुमध्ये बुधवारी लग्नाचे रिसेप्शन पार पडले. दोघांच्या कुटुंबातील नातेवाईक यावेळी सहभागी झाले होते. सोशल मीडियावर या दांपत्याचा लूक व्हायरल होत आहे. पण या लूकपेक्षाही जास्त एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
दीपिका रिसेप्शनमध्ये गोल्डन कलरची साडी आणि ग्रीन कलरच्या ज्वेलरीमध्ये दिसली. दीपिकाने रिसेप्शच्या ठिकाणी रणवीरच्या हातात हात घालून प्रवेश केला. फोटोसाठी पोज देत असताना दीपिकाच्या साडीचा पदर उलटा झाला. रणवीरने यावेळी क्षणाचाही विलंब न करता तातडीने तिच्या साडीचा पदर नीट केला. सध्या या दोघांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
दीपवीरने बंगळूरुपाठोपाठ आता मुंबईतही रिसेप्शनचे आयोजन केले आहे. 28 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला मुंबईतील ग्रँण्ड हयात येथे हे रिसेप्शन पार पडणार आहे. 28 नोव्हेंबरला रणवीरच्या घरच्यांसाठी, तर 1 डिसेंबरला बॉलिवूड कलाकारांसाठी रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे.

प्रियंका म्हणते; वेलकम होम बेबी

नुकताच इटलीतील लेक कोमो येथे ‘दीपवीर’चा शाही विवाहसोहळा पार पडला. चाहते आता देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या विवाहाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जोधपूरच्या उमैद भवनमध्ये लवकरच प्रियंका आणि निकचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. निक या विवाहसोहळ्यासाठी न्यूयॉर्कहून मुंबईत पोहोचला आहे.
निकसोबतचा आपला एक खास फोटो शेअर करत या फोटोला प्रियंकाने वेलकम होम बेबी असे कॅप्शन दिले आहे. येत्या 2 डिसेंबरला प्रियंका चोप्रा आणि निक जोनास लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांचा विवाहसोहळा 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर हे पाच दिवस रंगणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘दीपवीर’ प्रमाणे प्रियंका आणि निक हे देखील दोन पद्धतीने लग्नगाठ बांधणार असल्याचे म्हटले जात आहे. जोधपूर येथे पारंपरिक पद्धतीने विवाह झाल्यानंतर प्रियंका निक जोनाससोबत पून्हा ख्रिश्‍चन पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहे.

बाहुबलीचा ‘हा’ रेकॉर्ड 2.0ने प्रदर्शनापूर्वीच मोडला

येत्या 29 तारखेला दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांचा 2.0 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला असून या चित्रपटाबाबतची चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरनेही धुमाकूळ घातला होता. या ट्रेलरने अनेक रेकॉर्ड मोडले. 2.0 आता प्रदर्शनापूर्वीच ‘बाहुबली’ या सुपरडुपरहिट चित्रपटालाही टक्कर देताना दिसत आहे.
2.0 चित्रपटाची बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रजनीकांत आणि अक्षय कुमार एकत्र टक्कर देताना दिसणार आहेत. तमिळ, तेलुगु, आणि हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे एकुण बजेट हे जवळपास 500 कोटींचे आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 100 कोटींची कमाई केली आहे.
याबाबत एका माध्यमाने दिलेल्या माध्यमानुसार, बाहुबली चित्रपटाचा या बिग बजेट चित्रपटाने स्क्रिन्सच्या बाबतीत रेकॉर्ड मोडला आहे. तब्बल 6600 ते 6800 स्क्रिन्सवर हा चित्रपट झळकणार आहे. जवळपास 6500 स्क्रिन्सवर बाहुबली-2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला दाक्षिणात्य भागात 4000 ते 4100 स्क्रिन्स मिळाल्या आहेत. तमिळनाडुमध्ये 600 ते 625, केरळमध्ये 500 ते 525 आणि कर्नाटकमध्ये 300 स्क्रिन्सवर हा चित्रपट झळकणार असल्याचे वृत्त आहे. प्री-बुकिंगच्या माध्यमातून या चित्रपटाने तब्बल 120 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यामुळे, प्रदर्शनानंतर 2.0 चित्रपट अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अंकिताने ‘मणिकर्णिका’मध्ये साकारलेल्या झलकारीबाई पहिली झलक

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘मणिकर्णिका ˆ द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपट येणार असून कंगना चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची तर झलकारीबाईंची भूमिका अंकिता लोखंडे साकारणार आहे. बॉलिवूडमध्ये मणिकर्णिका चित्रपटातून पदार्पण करणार्‍या मराठमोळ्या अंकिताने आपला या चित्रपटातील पहिला फोटो शेअर केला आहे.
झलकारी बाईंची व्यक्तीरेखा साकारणार्‍या अंकिताने झलकारीबाई यांच्या 188 व्या जयंतीनिमित्त आपला खास लूक शेअर करत त्याला कॅप्शनही दिले आहे. झलकारी बाई एक अशा महिला सैनिक होत्या ज्यांनी राणी लक्ष्मीबाईंसोबत मिळून 1857 मध्ये युद्ध लढले होते. झलकारीबाईंना आजही राणी लक्ष्मीबाईंची एक उत्तम सल्लागार म्हणून ओळखले जाते, असे म्हणत अंकिताने त्यांच्या कार्याविषयीची माहिती दिली आहे.

कॅन्सरचे उपचार घेतल्यानंतर कामावर रुजू झाली आयुष्यमानची पत्नी!


स्तनाचा कॅन्सर अभिनेता आयुष्मान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यपला झाला होता. तिने त्यानंतर मास्टेक्टोमीचे उपचार घेतले असून ती आता कामावर पुन्हा रुजू झाली असल्याची माहिती ताहिराने स्वत: टिवट करुन दिली.
तिने टिवटमध्ये, काम सुरु..प्रिप्रोडक्शन, हॅपी थँक्सगिविंग. आभारी आहे. यासोबतच तिने एक फोटोही शेअर केला आहे. ती ज्यात गाडीमध्ये बसली आहे. आयुष्मानने ताहिराच्या या पोस्टला रिटिवट करत अभिमान असल्याचे म्हटले आहे.
एका कार्यक्रमात आयुष्मान म्हणाला होता, की मी खूप आनंदी आहे की मला ताहिरासारखा जोडीदार मिळाला. ती हुशार आहे, मजबूत आहे. ती माझी प्रेरणा आहे. मी वेगळ्या नजरेने जगाला पाहणे सुरू केले आहे.

‘द लायन किंग’चा ट्रेलर रिलीज

नव्वदच्या दशकात आलेल्या ‘सिम्बा’ कार्टुन कॅरेक्टरवर आधारित आलेला ‘द लायन किंग’ हा चित्रपटही बच्चे कंपनीमध्ये विशेष प्रसिद्ध झाला असून ‘द लायन किंग’ मधून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेऊन जंगलावर आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लढणार्‍या छाव्याची कहाणी दाखवण्यात आली आहे.
पण आजच्या बच्चेकंपनीच्या विस्मृतीत 90 च्या दशकात गाजलेला हा जंगलाचा राजा सिम्बा गेला आहे. म्हणूनच 90 च्या दशकातील या लोकप्रिय ‘लायन किंग’ला नवसंजीवनी देण्याचे डिझ्नेने ठरवले आहे. ‘ द लायन किंग’चा रिमेक 19 जुलैला प्रदर्शित होणार आहे. नुकताच याचा पहिला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 1994 मध्ये आलेल्या मूळ ‘द लायन किंग’चा हा रिमेक असणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली प्रत्येक दृश्य ही जून्या लायन किंगच्या दृश्याशी अगदीच मिळतीजुळती आहे.